Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिका हद्दवाढ भागात आरोग्याच्या सुविधा द्याव्यात-आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन

महापालिका हद्दवाढ भागात आरोग्याच्या सुविधा द्याव्यात-आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेने वाढीव मालमत्ता कर आकारणीच्या नोटीस पाठविणे रद्द करावे. हद्दवाढ भागात आरोग्याच्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड आणि शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मनपा आयुक्तांकडे केली.शिवसेनेच्या महिला सदस्यांनी सोमवारी आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन दिले. शहरात बेरोजगारांची संख्या जास्त आहे. अनेक सोसायटी व वसाहतींमधील नागरिक पेन्शनवर गुजराण करीत आहेत. कोविडच्या कालावधीत शहराचे मोठे नुकसान झाले.आर्थिक क्रयशक्ती व आर्थिक दर्जा पूर्णपणे खालावला. मनपा मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करते.त्या प्रमाणात सुविधा देत नाही.हद्दवाढ भागात पालिकेने दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.अक्कलकोट रोडसह हद्दवाढ भागात रस्ते,ड्रेनेज लाइनची कामे प्रलंबित आहेत.संगमेश्वर नगर, सिंहगड नगर, ओम गर्जना चौक, पडगाजी नगर, कर्णिक नगर या भागात नळाला घाण पाणी येत आहे. यावरही ठोस उपाययोजना व्हावी,अशी मागणी केली.यावेळी रुक्मिणी आलुरे, सैमंगल शिवनगी, राजश्री और संग, ज्योती शिवनगी,निर्मला सोनके,प्रभावती येलगुंडे,सरस्वती भागवत, शमीना शेख, शारदा पवार,शारदा दळवी,पुष्पा संगाटे,आशा यलगुंडे,रबिया शेख,लक्ष्मी म्हेत्रे, लक्ष्मी चोरमुले,मारमा कुंची आदी उपस्थित होत्या.

Reactions

Post a Comment

0 Comments