जिल्हा माहिती कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त अभिवादन
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंती निमित्त जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माहिती सहायक धोंडिराम अर्जुन, दुरमुद्रणचालक शरद नलवडे, लिपिक नि टंकलेखक अमित खडतरे, सर्वसाधारण सहायक आराध्या लोंढे, वाहनचालक भाऊसाहेब चोरमले, संदेशवाहक अनिल नलवडे, सेवानिवृत्त कर्मचारी इकबाल भाईजान आदी उपस्थित होते. या सर्वांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
No comments:
Post a Comment