निमगाव (टे) च्या वैभव शिंदे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 31, 2022

निमगाव (टे) च्या वैभव शिंदे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड...

 निमगाव (टे) च्या वैभव शिंदे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड...

           बेंबळे (कटुसत्य वृत्त): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सातव्या क्रमांकाने उतीण झालेल्या माढा तालुक्यातील निमगाव टे येथील वैभव भाऊराव शिदे यांची उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली आहे

           राज्यात सातव्या क्रमांकाने उतिर्ण होऊन खुल्या प्रवर्गात निवड झाले बद्दल अनेक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून त्याचे  सत्कारही करण्यात आले होते. 

           आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पसंती क्रमांक व मिळालेल्या गुणाचे अधारावर वैभव शिंदे यांची उपमुख्यकार्यकारी पदावर निवड झाल्याचे जाहीर केले आहे

           वैभव शिंदे याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निमगाव टे येथे माध्यमिक शिक्षण विठ्ठल राव शिदे प्रशाला निमगाव टे व ज्ञानप्रबोधिनी पुणे येथे झाले आहे . बारावीपर्यंतचे शिक्षण आबासाहेब गरवारे काँलेज पुणे येथे तर बी ई मँकेनिकलची पदवी ढोले पाटील इंजिनिअर काँलेज पुणे येथून प्राप्त केली आहे.

           त्याला महाराष्ट्र शासनाच्या सारथी प्रशिक्षण संस्था व सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्पर्धा प्रशिक्षण संस्था याचेकडुन स्पर्धा परीक्षा चे मार्गदर्शन मिळाले. पिंपळनेर  केंद्र शाळेचे प्रमुख व निमगाव टे चे पत्रकार भाऊराव शिंदे हे वैभव चे वडील आहेत.

           उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे दूध संघाचे चेअरमन रंणजीत भैया शिंदे माढा तालुक्याचे सभापती विक्रम दादा शिंदे पंचायत समिती सदस्य धनराज दादा शिंदे विठ्ठल कार्पोरेशन चे अध्यक्ष अध्यक्ष यशराज शिंदे व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी वैभव याचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages