सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढली नसते तर त्यांची हत्त्या झाली नसती?
.png)
मारेकऱ्याला फाशी द्या काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांची मागणी
पुणे (कटूसत्य वृत्त):- पंजाब येथील सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेस युवा नेते सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा कायम असते तर त्यांची हत्त्या झाली नसती असे मत स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की मुसेवाला हे सुप्रसिद्ध गायक तर होतेच परंतु ते पंजाब काँग्रेस येथील युवा नेते होते.एका नामांकित गायकाची आणि काँग्रेस युवा कार्यकर्त्याची हत्त्या होणे हे अत्यंत चुकीचे व निंदनीय प्रकार आहे. हल्ले खोरांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.त्यांच्या हत्त्या मागचे खरे कारण समोर आले पाहिजे.आणि याचा छडा सीबीआय लवकर लावतील व संबंधित गुन्हेगारांना गजाआड करतील असे मत स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment