महिलेचा गळा आवळून खून, पोलिसांत गुन्हा दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 31, 2022

महिलेचा गळा आवळून खून, पोलिसांत गुन्हा दाखल

महिलेचा गळा आवळून खून, पोलिसांत गुन्हा दाखल

            बार्शी (कटूसत्य वृत्त):- शहरातील पंकजनगर येथील मुस्लिमा लुथफार_ सरदार वय-३५ वर्षे या महिलेचा गळा दाबून खून झाल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम -३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. सदरील महिलेस महाबूर १२ वर्षे व आसिक १० वर्षे दोन मुलं आहेत. मुस्लिमा ही मुळची पश्चिम बंगालमधील असून कामाच्या निमित्ताने ती महाराष्ट्रात आली होती.

            याबाबत, अधिक माहिती अशी की ,बागबुल उर्फ शाकिर हुसैन शेख वय-३८ वर्षे रा.कलबंगा,ता.नाक्षिपारा, जि.नाडिया पश्चिम बंगाल येथील असून मयत महिलेसोबत तो ३ वर्षांपासून राहत होता. २८ मे रोजी बागबूल याने सकाळी मयत महिलेस कामावर जाऊ नकोस असे म्हणून भांडण केले होते. त्यानंतर चार वाजताचे सुमारास बागबुलने मयत महिलेच्या दोन्ही मुलास बाहेर जाऊन खेळण्यास सांगितले होते. थोड्यावेळाने दोन्ही मुले खेळून घरी आल्यानंतर त्यांनी घराचा समोरील दरवाजा वाजवून उघडण्याचा प्रयत्न केला परंतू तो उघडला नाही. खूप वेळ झाला तरी दरवाजा न उघडल्याने त्यांच्यापैकी आसिक हा पाठीमागील दरवाजाकडे गेला असता त्यावेळी दरवाजा उघडा असुन मयत महिला किचनमध्ये खाली पडलेली दिसली व तिच्या गळ्याभोवती ओढणी असल्याचे दिसले. त्यावेळी, त्याने समोरील दरवाजा उघडून महाबुर यास आतमध्ये बोलविले व दोघांनी मयत महिलेस उठविण्याचा प्रयत्न केला परंतू आई उठत नसल्याने तसेच बागबुल ही कोठे दिसत नसल्याने त्यांनी घरमालक बापू मिरगणे यांना फोन करून सर्व प्रकार सांगून बोलावून घेतले.

            बापू मिरगणे हे घरी आल्यानंतर त्यांनी शेजारील सबिना निजाम खान यांचे मदतीने सदर महिलेस जगदाळ मामा हॉस्पीटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी सदर महिला मयत झाली असल्याचे सांगून त्याबाबत पोलीस ठाणेस कळविले. त्यानंतर पोलिसांनी मयत महिलेच्या घरी आलेला बागबुल याचा शोध घेतला परंतू तो कोठेही मिळून आला नाही. त्याचा व मयत महिलेचा मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही मोबाईल स्विच ऑफ असल्याचे दिसून आले. दरम्यान, याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकूळ यांनी भादंवि कलम - ३०२ प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages