माढा मतदारसंघासाठी जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांना 13 कोटीचा निधी मंजूर - आ.बबनराव शिंदे

बेंबळे (कटूसत्य वृत्त):- माढा तालुका व माढा मतदारसंघातील समाविष्ठ असलेल्या पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील नळ पुरवठा योजनेसाठी जल जीवन मिशन अंतर्गत 13 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामांना सुरूवात होणार असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा ही महत्वाची बाब असून नळ पाणी पुरवठा योजनेमुळे माढा मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. माढा मतदारसंघातील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी शासकीय योजनामधून निधी मिळणेसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करणेत आलेला असून माढा मतदारसंघातील माढा तालुका-चिंचोली, कापसेवाडी, हटकरवाडी, रूई, आलेगांव(बु), वडाचीवाडी , उंदरगांव, लोणी,नाडी ,भेंड,परिते,भुताष्टे, शिंगेवाडी,अकुलगाव, माळशिरस तालुका- लवंग,खळवे , कोंडारपट्टा व पंढरपूर तालुका- देगाव या गावातील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी एकूण रू.12.99 कोटी निधी मंजूर झाला आहे.माढा मतदारसंघातील कांही गावे नदी काठावर असून या योजनेमुळे त्या गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणेस मदत होणार असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली. (मंजूर निधी)
माढा तालुका-चिंचोली (97.94 लाख), कापसेवाडी (37.29 लाख),हटकरवाडी (24.86 लाख), रूई (70.14 लाख), आलेगांव(बु) (95.04 लाख), वडाचीवाडी (35.38 लाख), उंदरगांव (110.98 लाख) लोणी (34.21 लाख),नाडी (35.40 लाख),भेंड (72.96 लाख),परिते (117.63 लाख) भुताष्टे (127.40 लाख),शिंगेवाडी (58.11 लाख),अकुलगाव(81.30 लाख) एकूण रू.998.34 लाख माळशिरस तालुका- लवंग (26.79 लाख),खळवे (23.90 लाख), कोंडारपट्टा (52.40 लाख) एकूण रू.103.09 लाख व पंढरपूर तालुका- देगाव (197.89 लाख) असा एकूण रू.13 कोटी निधी मंजूर झाला आहे.
No comments:
Post a Comment