कुर्डूवाडीत अहिल्यादेवी होळकर जयंती विविध कार्यक्रमने साजरी! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 31, 2022

कुर्डूवाडीत अहिल्यादेवी होळकर जयंती विविध कार्यक्रमने साजरी!

कुर्डूवाडीत अहिल्यादेवी होळकर जयंती विविध कार्यक्रमने साजरी!

             कुर्डूवाडी (कटुसत्य वृत्त):- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेऊन जयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला.प्रारंभी बालोद्यान येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास महिलांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

             यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री सुसलादे,ज्योती देवकाते यांच्या हस्ते पुतळ्यास दुग्धाभिषेक तर संतोष भिसे दांपत्याने अहिल्यादेवी होळकर यांची महाआरती केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर दिवसभर धनगरी ओव्या चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

             यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे,ज्ञानेश्वर सलगर,संतोष भिसे,आप्पा बोरकर,राजू भिसे,जगन्नाथ क्षिरसागर,धनाजी कोकरे,मयुर खरात,नगरसेवक प्रकाश गोरे,संजय गोरे,निवृत्ती गोरे,अरुण काकडे,हरी बागल,डॉ.मोहसिन मकनू,सोमनाथ देवकते,सूर्यकांत गोरे,प्रा.मोहन खरात,राजू क्षिरसागर,आशाताई टोणपे,वैभवीताई भिसे,सुहास टोणपे, सुरेश बागल,दादा अनभुले,संदीप भराठे,सुधीर गाडेकर,संतोष क्षिरसागर,हरी भराटे,शिवाजी चौधरी, सत्यवान हांडे,बालाजी पाटील,पवन पाटील,बबलू वाल्मिकी,औदुंबर लेंगरे,अमोल सुसलादे आदी उपस्थित होते.

जयंती निमित्त १०१ जणांचे रक्तदान!

             अहिल्या प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.सचिन माडेकर,डॉ.लकि दोशी,डॉ.आकाश सुसलादे,डॉ. आदित्य सोनवर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

             यावेळी प्रतिष्ठानचे अभिजीत सोलंकर,संकेत होनमाने,सागर होनमाने,पवन पाटील,स्वरूप भिसे, ओम सुसलादे,विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.

शिंगेवाडी येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

             पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ वी.जयंती शिंगेवाडी ता.माढा येथे साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रतिमेचे पूजन रघुनाथ बाबा खरात यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उपसरपंच विजय पाटील,रा.स.प.चे दिलीप गडदे,अर्जुन शिंदे,शिवाजी सोलवणे, राजेंद्र शिंदे,बाबा जाधव,दादासाहेब सोलवणे,रासपचे नेते भीमराव लवटे, शिवाजी संदीपान सोलवणे,कानिफ परबत,दत्तात्रय शिंदे,महिपती सोलवणे,ग्रामसेवक शिवाजी गवळी, परसू कांबळे व दीपक सातपुते यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages