गोळाफेक स्पर्धेत बेंबळेचा मंगेश पवार राज्यात दुसरा... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 16, 2022

गोळाफेक स्पर्धेत बेंबळेचा मंगेश पवार राज्यात दुसरा...

गोळाफेक स्पर्धेत बेंबळेचा मंगेश पवार राज्यात दुसरा...

             बेंबळे : महाराष्ट्र राज्य अँथलेटीक असोसिएशन व मान्यताप्राप्त ड्रीम्स राज्यस्तरीय अँथलेटीक मैदानी स्पर्धा 2022 मध्ये बेंबळे येथील ग्रीन व्हिलेज फाउंडेशनच्या स्पोर्ट्स टीमचा सदस्य व येथील विमलेश्वर विद्यालयाचा इयत्ता सातवीतील  विद्यार्थी चि. मंगेश विजय पवार याने, इंदापूर (जि. पुणे )येथे भरवण्यात आलेल्या 14 वर्षे वयोगटाखालील राज्यस्तरीय मुलांच्या गोळाफेक स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे, याबद्दल त्याला एक हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्रक मिळाले आहे. त्याने खेळाचा सराव मोहन भोसले यांच्या ग्राउंडवर केला असून, पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणाकडून मंगेशला मार्गदर्शन लाभले आहे. मंगेश ला अभ्यास,खेळ व शेतीची आवड असून शेतामध्ये तो वडिलांना नेहमी मदत करत असतो तर घरी सैनिक स्कूल स्पर्धेसाठी जोमाने अभ्यास करत आहे. येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुश पवार यांचा मंगेश हा नातू असून लहान वयात कमवलेल्या मोठ्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages