आदर्श शिक्षक रामप्रसाद पवार यांच्या सत्कार संपन्न... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 16, 2022

आदर्श शिक्षक रामप्रसाद पवार यांच्या सत्कार संपन्न...

आदर्श शिक्षक रामप्रसाद पवार यांच्या सत्कार संपन्न...

            बेंबळे (कटुसत्य वृत्त): प्राथमिक शिक्षक रामप्रसाद गंगाधर पवार यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अंकुशराव लांडगे नाट्यगृह,भोसरी, पुणे येथे शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सुधीर तांबे व ज्येष्ठ साहित्यिक तथा मराठी सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. आदिवासी भागातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल पवार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कुर्डूवाडी ता. माढा येथे  मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. 

            यावेळी मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, कुर्डूवाडी शहर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन महिंगडे ,अ‍ॅड. बाबाफरीद पठाण, प्रगतशील युवा शेतकरी शरद गाडे, स्वप्निल केमदारणे, किरण लोंढे आदी उपस्थित.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages