ऊसात भाजीपाल्याचे आंतरपिक घेऊन दोन महिन्यात कमावले २ लाख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 16, 2022

ऊसात भाजीपाल्याचे आंतरपिक घेऊन दोन महिन्यात कमावले २ लाख

ऊसात भाजीपाल्याचे आंतरपिक घेऊन दोन महिन्यात कमावले २ लाख 

अंबाड येथील युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

              बेंबळे (कटुसत्य वृत्त): अंबाड ता. माढा येथील ऊस उत्पादक युवा शेतकऱ्याने ऊसामधे आंतरपिके घेण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करीत सुरू ऊसात कोथिंबीर, शेपु, चुका ही भाजीपाल्याची आंतरपिके घेतली. यात दिड एकर सुरू ऊसातील आंतरपिकातून त्यांना दोन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 

              वृत्तांत असा की शरद गाडे हे युवा शेतकरी असून त्यांना नऊ एकर शेती आहे. शेतीत नवीन काय करता येईल यासाठी सतत मेहनत घेत असतात. शेतीसाठी शाश्वत उत्पन्न देणारे  एकमेव पीक म्हणजे ऊस असे सध्या मानले जात आहे. गाडे यांनी फेब्रुवारीत दिड एकराच्या क्षेत्रात को ८६०३२ या जातीच्या सुरू ऊसाची लागवड केली. उसाच्या दोन सरीत साडेचार फुटांचे अंतर ठेवले. उसाची लागण सरीमध्ये केल्यानंतर सरी वरंब्याच्या दोन्ही बाजूला टोकण पद्धतीने कोथिंबीर, चुका, शेपू अशा भाजीपाल्यांच्या आंतरपीकांची लागवड केली. यासाठी त्यांनी धन्याचे ३० किलो, शेपाचे २० किलो, चुक्याचे ४० किलो बियाणे वापरले. यासाठी २० हजार रूपये अपेक्षित खर्च आला. गाडे यांनी आपला भाजीपाला पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी न पाठवता स्थानिक बाजारपेठेत विकला. इंदापूर, कुर्डूवाडी, अकलूज, बार्शी, पिंपळनेर येथे ठोक व किरकोळ विक्रीतून कोथिंबीरला प्रती शेकडा पेंढीला १००० ते १५०० रूपये भाव मिळाला यातून त्यांना ७५ हजार रूपये मिळाले. चुका शेपू ला प्रती शेकडा पेंढीला १२०० ते १५०० रूपये भाव मिळाला यातुन त्यांना १ लाख २० हजार रुपये उत्पन्न मिळाले.  दिड एकर सुरू ऊसातील आंतरपिकातून साधारणपणे दोन महिन्यात गाडे यांनी एकूण दोन लाख रूपये उत्पन्न मिळविले. २० हजार रूपये बियाणांचा खर्च, मशागतीचा १० हजार रूपये खर्च वजा जाता पावणेदोन लाखांचे निव्वळ नफा त्यांनी कमावला आहे. यासाठी त्यांना वडिल चंद्रकात शिवाजी गाडे व कुर्डू ता.माढा येथील युवा भाजीपाला उत्पादक शेतकरी किरण तुकाराम लोंढे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शरद गाडे हे भाजीपाला आंतरपिक काढल्यावर त्याच ऊस क्षेत्रात दोन सरीमधील साडे चार फूट अंतरातील रिकाम्या जागेत दुसरे द्विदल वर्गातील आंतरपिक घेणार असून त्यातूनही किमान एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा मानस आहे कारखान्याला ऊस गाळपासाठी जाण्याअगोदरच आंतरपीक द्वारे अडीच ते तीन लाख रुपये निव्वळ मिळवण्याचा गाडे यांचा प्रयत्न आहे. शरद गाडे यांनी केलेला आंतरपिकाचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages