शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

सांगोला (कटुसत्य वृत्त): राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निकच्या राष्ट्रीय सेवा योजना व अक्षय ब्लड सेंटर, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30/4/2022 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांनी दिली.
सांगोला तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, कृषी व सहकार क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केलेले श्री. बाबुराव गायकवाड यांचा वाढदिवस शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये रक्तदान सारख्या समाज उपयोगी कार्याने साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ. पियुष साळुंखे पाटील व संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त श्री. एम. आर. गायकवाड यांच्या हस्ते झाले. प्रारंभी उद्घाटक डॉ. साळुंखे-पाटील यांचा सत्कार श्री. एम. आर. गायकवाड यांनी केला. यावेळी अक्षय ब्लड सेंटर चे जनसंपर्क अधिकारी श्री. अजय रुपणर, संजय सरक यांचाही सत्कार करण्यात आला. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 79 रक्तदात्यांनी रक्तदान करून हे रक्तदान शिबिर यशस्वी केले. शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिला. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. पियुष साळुंखे पाटील म्हणाले की सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये भाऊंचे योगदान उल्लेखनीय असून रक्तदान यासारख्या समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने आपण सर्वजण भाऊंनी घालून दिलेल्या आदर्शावर मार्गक्रमण करत आहोत. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. ए. आर. गायकवाड , सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. आर. व्ही. लिगाडे,श्री. पी. बी. गायकवाड , सर्व विभाग प्रमुख , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments