Hot Posts

6/recent/ticker-posts

शनि अमावस्ये निमित्त शिराळ टे. येथे बारा हजार भाविकांची उपस्थीती...

शनि अमावस्ये निमित्त शिराळ टे. येथे  बारा हजार भाविकांची उपस्थीती...

           बेंबळे : टेंभुर्णी शहराच्या पश्चिमेस पाच किलोमीटर अंतरावर हैदराबाद-मुंबई महामार्गालगत असलेल्या शनि शिराळ येथे शनिआमावस्ये निमित्त अकरा ते बारा हजार भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले असल्याची माहिती विश्वस्त प्रमुख हिंमत तळेकर यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील प्रतिकृती असलेल्या जागृत देवस्थान शनी शिराळ येथे शनि आमावस्ये निमित्त शनीदेवाच्या मूर्तीस पहाटे पाच, दुपारी साडेबारा व रात्री आठ वाजता दुग्धाभिषेक, रसाभिषेक व तैलाभिषेक करण्यात आला, त्याचप्रमाणे तीनही वेळी महाआरती होऊन महानैवेद्द्याचे आयोजन करण्यात आले होते. 

           दिवसभर भाविक तैलाभिषेक, रूटीची पाने ,उडीद व मीठ वाहून तसेच नारळ फोडून पेढ्याचा नैवेद्य देवाला दाखवत होते. लाँकडाऊन नंतर पहिल्यांदाच एवढा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होत असल्याचे येथील गावकऱ्यांतून  बोलले जात होते.


साबुदाणा वडे व गोड दही प्रसाद...

           विश्वस्त मंडळा तर्फे या दिवशी अडीच क्विंटल साबुदाणा दोन क्विंटल शेंगदाणे दोन क्विंटल बटाटे एक क्विंटल तेल व आवश्यक सामग्री सह बारा हजार भाविकांना सकाळपासून रात्रीपर्यंत साबुदाण्याचे वडे व गोड दही प्रसाद म्हणून देण्यात येत होते. या जागृत शनिदेवस्थानचे महत्त्व सोलापूर, पुणे, कोल्हापूर फलटण अकलूज इंदापूर पंढरपूर आदी सर्व भागातून  वाढलेले दिसून येत आहे.

दुसरा चबुतरा बांधून देणार... 

           हर्षवर्धन पाटील शिराळा येथील शनेश्वरा च्या दर्शनासाठी आजी-माजी आमदार खासदार मंत्री अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच मोठे उद्योगपती व सर्व सामान्य भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. आज शनि अमावस्या निमित्त दर्शनासाठी आलेले भाजपचे नेते व इंदापूरचे माजी आमदार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवस्थान ट्रस्ट बरोबर चर्चा करून संपूर्ण माहिती घेतली व या मंदिराशेजारीच दुसरा मोठा चबुतरा बांधून देण्याचे अभिवचन दिले. त्यांचेबरोबर  पुणे जिल्ह्यातील काही  कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.



Reactions

Post a Comment

0 Comments