दीपाली सय्यद वर कारवाई करा ; भाजपा महिला मोर्चाची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 31, 2022

दीपाली सय्यद वर कारवाई करा ; भाजपा महिला मोर्चाची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दीपाली सय्यद वर कारवाई करा ; भाजपा महिला मोर्चाची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

              मुंबई, (कटुसत्य वृत्त): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या अभिनेत्री दीपाली  सय्यद हिच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश महिला मोर्चा तर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. दिपाली सय्यद यांच्या विरुद्ध नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

              भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, प्रणिता चिखलीकर-देवरे, अॅड.वर्षा डहाळे, रिदा रशीद, रिटा मकवाना, शिल्पा गणपत्ये, प्रिया शर्मा आदींच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सय्यद यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याचे निवेदन दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages