Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रिजमोहन फोफलिया यांचा ६९ वा वाढदिवस जेष्ठ नागरिकांच्या जल्लोषात संपन्न

ब्रिजमोहन फोफलिया यांचा ६९ वा वाढदिवस जेष्ठ नागरिकांच्या जल्लोषात संपन्न

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामूहिक विवाहचे प्रणेते ब्रिजमोहन फोफलिया यांचा ६९ वा वाढदिवस  जेष्ठ नागरिकांच्या जल्लोषात संपन्न झाला. जेष्ठ नागरिकांसाठी २००२ पासून मनोरंजनाचे कार्यक्रम आश्रमात प्रत्येक रविवारी संपन्न होत होते. मागच्या दोन वर्षा मध्ये कोरोनाच्या महामारीमुळे या प्रथेला खंड पडला होता. मा.ब्रिजमोहन फोफलिया यांनी आपल्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त सर्व जेष्ठ नागरिकांच्या समवेत जल्लोष साजरा करून खंड पडलेल्या प्रथेचा पुनःच हरीओम केला. प्रत्येक रविवारी ब्रिजधाम आश्रम मध्ये जेष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम अखंड होणार आहेत . 

            सकाळी नऊ  वाजल्यापासून सोलापूरतील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर निवास्थानी भेट देऊन शुभेच्छाचा वर्षाव करत होते . सायंकाळी ५ वाजता ब्रीजधाम आश्रम मध्ये जल्लोष कार्यक्रमाला सुरुवात झाली. सोलापुरातील सर्व जेष्ठ नागरिक हजारोच्या संखेने उपस्थित होते. विद्युत रोषणाई , आश्रमाची हिरवळ, संगीत , अशा आनंदाच्या वातावरणात आश्रम न्हाऊन निघाला होता. सर्व लहान थोर , मान्यवर ब्रिजमोहन फोफलिया यांना भेटून शुभेच्छा देत होते. अनेक कलावंतानी या कार्यक्रमात आपली कला सादर केली. या मध्ये संदीप कुलकर्णी , अरुण गुजर, श्वेता म्हेत्रे , उमाकांत पाटील, सुनिता राठोड, ऋषिकेश त्रिवेदी, राशीद पठान, प्रभार सलगर, भारत कदम, अभिमान कदम, श्रीमंत कदम, नवनाथ कदम , अशा अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली. झिंगाट च्या गाण्यावर सर्व जेष्ठ नागरिकांनी ठेका धरला. बेभान होऊन जेष्ठ नागरिक नाचत होता.  या मध्ये महिला, लहान मुले यांचा सुद्धा सहभाग होता.  आश्रमाचे वातावरण जल्लोषमय झाले. 

            जेष्ठ नागरिकांची घरात, समाजात अवहेलना होते. त्यांना मानसिक संधान भेटत नाही . अशा वृद्धांसाठी ब्रीजधाम आश्रम एक आनंदाचे ठिकाण आहे. इथे येणारा प्रत्येक जेष्ठ नागरिकाला आनंद मिळाला पाहिजे. त्याचे मनोरंजन झाले पाहिजे . त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच माझे सुख आहे अशा शब्दात ब्रिजमोहन फोफलिया यांनी आपले  निखळ मत व्यक्त केले. सवांद साधतना त्यांचा कंठ भरून आला होता. जेष्ठ नागरीकाविषयी असणारे प्रेम, त्यांच्या विषयी असणारी आस्था, जेष्ठ नागरिकांना आनंद देण्यासाठी चाललेली त्यांची धडपड याचे वर्णन शब्दात करता येत नाही. 

            साल २००२ पासून आश्रमात जेष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहे. आज पर्यंत हजारो कार्यक्रम आश्रमात पार पडले. लाखो कलाकरांनी आपली कला सादर करून जेष्ठांना आनंद दिला. प्रत्येक कालाकारंचा गौरव करून, त्यांना मानधन देऊन, सत्कार केला. आता त्यांचे आश्रमाशी नाते घट्ट झाले आहेत. हा जेष्ठ नागरिकांसाठी चालेला जागर, त्यांना त्यांना सुख समाधान देण्यासाठी लागणारी मेहनत, वेळ, पैसा, याचा हिशोब ब्रिजमोहन फोफलिया यांनी कधीच ठेवला नाही , जेष्ठांच्या सुखातच त्यांचे सुख आहे हे त्यांच्या कार्यातूनच दिसून येत.

            जेष्ठांसाठी आयोजित केलेल्या जागर या कार्यक्रचा सर्वांनी आनंद लुटला. या पुढे असेच आश्रमात सर्व जेष्ठांनी आनंद घेण्यासाठी आश्रमात यावे अशी हाक त्यांनी सर्वाना दिली. सर्वांनी भोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला. 

Reactions

Post a Comment

0 Comments