छत्रपती शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त सोलापूरात होणार पाळणा सोहळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव कमिटी, बाळे यांच्या वतीने शुक्रवार दिनांक १३ मे २०२२ रोजी पाळणा सोहळ्याचे आयोजन छत्रपती संभाजीराजे चौक, जुना पूना नाका, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शहर व बाळे परिसरातील मोठ्या प्रमाणात महिला शिवशंभू प्रेमी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम स्थळी ठीक ११.४५ मि. सर्व उपस्थित महिलांच्या आवाजात एक सुरात छत्रपती संभाजी महाराजांचा पाळणा पार पडला जाईल. त्यानंतर शंभूराजे यांच्या वरील अंगाई गीत काही निवडक महिला सादर करतील. ठीक १२.०० वाजता गुलाल व पुष्पवृष्टी करून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येईल. हा कार्यक्रम कोणत्याही संघटनेचा अथवा पक्षाचा नसून सर्व शिवशंभू प्रेमींनी एकत्रित येऊन आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर शहरातील ५ महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
0 Comments