ग्रंथपालन परीक्षेत प्राविण्य मिळविल्याने करियर घडते- संतोष जाधव
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रंथपालन वर्ग सन- 2021 मध्ये झालेल्या परीक्षेत सोलापूर केंद्रात प्रथम क्रमांकाने यश मिळविल्याने विशाल पाटील हे करियर घडवतील असे उदगार संतोष जाधव,जिल्हा ग्रंथालय अधिकारी , सोलापूर यांनी काढले.ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचेमार्फत ग्रंथपालन वर्ग सोलापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप प्रसंगी संतोष जाधव बोलत होते.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांचे परीक्षाधिकारी प्रमोद पाटील,ग्रंथमित्र कुंडलिक मोरे,ग्रंथमित्र जयंत आराध्ये,वर्गव्यवस्थापिका सारिका मोरे,मुख्याध्यापक अविनाश गायकवाड,शिक्षक गणेश फंड,दत्ता मोरे,संतोष भागवत,वृषाली हजारे इत्यादिनी अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिपिक सारिका माडीकर यांनी केले.सोलापूर केंद्रात ७०० पैकी ५१४ गुण मिळवून विशाल माधव पाटील प्रथम, ५०४ गुण मिळवून सचिन विलास कांबळे द्वितीय,तर ४९७ गुण मिळवून मयुरी मारुती गोवे या तृतीय आल्या .शिपाई दत्तकुमार पोलके यांनी परिश्रम घेतले.
0 Comments