Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरचे भाजप नेते खोटारडे - प्रकाश वाले

सोलापूरचे भाजप नेते खोटारडे - प्रकाश वाले

           सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी शुक्रवारी शहराच्या पाणी पुरवठ्या वरून महापालिका प्रशासक पी शिवशंकर यांना निवेदन देत उलट पाणी पुरवठा विस्कळीत होण्याला प्रशासन जबाबदार असल्याचे खापर आमदार देशमुख यांनी फोडले होते.

           यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टी वर टीका केली, आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता वाले यांनी मागील पाच वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता होती 2017 च्या महापालिका निवडणुकीत दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणारे भाजप आता खोटे बोलत आहे, यावरून भाजपचे सोलापुरातील नेते सुद्धा खोटारडे असल्याचा आरोप परत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा हल्लाबोल केला.

Reactions

Post a Comment

0 Comments