Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक न्याय विभागाच्या स्टॉलला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली भेट

सामाजिक न्याय विभागाच्या स्टॉलला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली भेट

          सोलापूर, (कटुसत्य वृत्त): पोलीस परेड मैदानावर सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या स्टॉलला ध्वजारोहन झाल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन पाहणी केली.

          अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक यांसह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत, या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र दिनी सामाजिक न्यायाचा जागर १ मे, महाराष्ट्र दिनी सोलापूर जिल्ह्यामध्ये गावागावात, झेंडा वंदनाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे वाचन करून उपस्थित नागरिकांना योजनांचे माहितीपत्रकाचे वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

           श्री. भरणे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांच्याकडून घेतली. श्री. आढे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गाला घरकुल, शिष्यवृत्ती, दिव्यांगांसाठी मदत, विविध पुरस्कार यांची माहिती दिली. जिल्ह्यातील नागरिकांनी समाज कल्याण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. भरणे यांनी केले. श्री. भरणे यांनी आपल्या भाषणामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची व रमाई आवास योजना या योजनेंतर्गत उल्लेखनीय काम केल्याचे नमूद केले.

          1 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अमलात  विभागाने आणली असून यासंदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार दि. 1 मे, महाराष्ट्र दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात आल्या.

          शासकीय ध्वजारोहन मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा स्टॉल उभा करून सदर स्टॉलमध्ये योजनेची संक्षिप्त स्वरूपात माहितीचे घडीपत्रिकाचे वाचन करून वाटप करण्यात आले.

          यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरिष बैजल, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप धोत्रे आदींनी भेट देऊन पाहणी केली.

          हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका , नगरपालिका , पंचायत समिती , तहसिल कार्यालय व ग्रामपंचायतीच्या झेंडा वंदनाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे वाचन करून उपस्थित नागरिकांना योजनांच्या माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments