Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक परिवर्तन विचार मंच इंडिया पंढरपूर शहराध्यक्षपदी आनंद भागानगरे

सामाजिक परिवर्तन विचार मंच इंडिया पंढरपूर शहराध्यक्षपदी आनंद भागानगरे

           पंढरपूर (कटुसत्य वृत्त): सामाजिक परिवर्तन विचार मंच इंडिया पंढरपूर शहराध्यक्षपदी आनंद भागानगरे यांची निवड करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.सुदर्शन मसुरे यांच्याहस्ते देण्यात आले. 

           यावेळी ए.के.ग्रुपचे प्रमुख अक्षय कदम, योगेश सुरवसे, राहुल साळुंखे, सनी कुकडे, मयूर रोहिटे, प्रकाश राऊत, तुकाराम साळुंखे, अक्षय पवार, शुभम सुरवसे, युवराज भागानगरे, सुरज कुकडे, धनंजय नांदरे, ईश्वर खंडेलवाल आदि उपस्थित होते.

           सामाजिक परिवर्तन विचार मंच इंडिया ही सामाजिक संघटना समाज घटकांतील वंचित, शोषित व उपेक्षित घटकांसह गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडत असते. त्यामुळे अनेकांनी या संघटनेच्या माध्यमातून आपला प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.सुदर्शन मसुरे यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments