Hot Posts

6/recent/ticker-posts

नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर ; वकीलांची कोर्टात माहिती

नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर ; वकीलांची कोर्टात माहिती

          मुंबई, (नासिकेत पानसरे):- राष्ट्रवादी कॉग्रेस नेते मंत्री नवुाब मलिक यांची प्रकृती अत्यमत गंभीर असून त्यांना स्ट्रेचर वरून जे जे रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या तीन दिवसापासून ते आजारी असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी पीएमएलए कोर्टात दिली.

          गेल्या अनेक दिवसापासून नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. ते आजारी असल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी कोर्टाला का दिली नाही असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. नवाब मलिक गेल्या तीम दिवसा पासून आजारी असून कारागृहात पडल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना जे जे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. 

          नवाब मलिक यांच्या प्रकृतीचे कारण देत त्यांना खाजगी रूग्नालयात दाखल करण्याची मागणी त्यांच्या वकीलांनी केली. मात्र ईडीने जे जे हॉस्पिटलच्या अहवाला शिवाय त्यांना खाजगी रूग्नालयात हलविण्यात येणार नसल्याचे सांगत नकार दिला आहे.त्यामुळे सध्या तरी त्यांना जे जे हॉस्पिटलमध्येच उपचार घ्यावे लागणार आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments