सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी संदर्भातील निर्णय लवकरच-आयुक्त पी. शिवशंकर
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातून विमान सेवेला अडथळा ठरणाऱ्या होटगी रस्त्यावरील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी संदर्भातील निर्णय लवकरात लवकर देण्यात यावा, अशी विनंती महापालिका प्रशासनाने आपल्या वकिलांमार्फत लेखी स्वरूपात उच्च न्यायालयात शहरातील होटगी केली असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.रस्त्यावरील विमानतळ येथून उडान योजनेतून विमान सेवा सुरू करण्यासाठी विविध हालचाली सुरू आहेत. विमान सेवेला विविध अडथळयांमधील प्रमुख अडथळा ठरत असलेली होटगी रस्त्यावरील कुमठे शिवारातील सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी देखील अनेक हालचाली झाल्या. यासाठी महापालिका प्रशासनाकडून दोनवेळा निविदा काढण्यात आली. मात्र ऊस गाळप हंगाम व इतर कारणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारे न्यायालयात ही सुनावणी 'तारीख पे तारीख' देण्यात येऊन प्रलंबित राहत आहे. न्यायालयात कारखाना प्रशासनाने दाखल केलेल्या याचिकेवर एकत्रित सुनावणी सुरू आहे. यामध्ये महापालिका, कारखाना प्रशासन आणि विमान प्राधिकरणाकडून युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. यावर निर्णय अद्याप आलेला नाही.
0 Comments