महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे अंशत: खासगीकरण करण्याचा निर्णय

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सेवा मार्गांच्या चार भागांपैकी एका भागात महापालिकाच सेवा देणार, तीन भागांचे खासगीकरण महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे अंशत: खासगीकरण करण्याचा निर्णय प्रशासकाने घेतला आहे. त्याची निविदा उद्या शुक्रवारी निघणार आहे.परिवहन उपक्रम तोट्यात आहे. तो काही केल्या फायद्यात येत नाही. त्यामुळे यापूर्वी महापालिका सभागृहाने खासगीकरण करण्याचा ठराव केला होता.खासगीकरणाविषयी माहिती देताना आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले की, शहरातील बससेवेच्या मार्गांची यादी करून त्याचे चार भाग केले जाणार आहेत. या चार भागांपैकी एक भाग महापालिका परिवहन विभागासाठी ठेवणार आहे. त्या भागावर परिवहन विभागाकडे जेवढ्या बसगाड्या आणि कर्मचारी आहेत तेथे ते काम करतील. उर्वरित तीन भागांचे खासगीकरण केले जाणार आहे. खासगीकरण केले तरी प्रवासाचे तिकीट दर महापालिकाच ठरवणार आहे. त्यामुळे प्रवाशांची लूट होणार नाही. बस गाड्यांमुळे प्रवाशांना कमी पैशात प्रवास मिळेल. खासगीकरण केल्यानंतर वेळेवर आणि सुरळीत बससेवा मिळणे गरजेचे आहे, असेही आयुक्त यांनी सांगितले.बुधवार पेठ परिसरातील बस डेपोच्या इमारतीवर १९४९ तारीख लिहिली आहे. त्यावरून ही सेवा तेव्हापासून सुरू असल्याचे बोलले जात आहे. नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. यानंतर महापालिकेत परिवहनचे स्वतंत्र विभाग झाला आणि त्याची समिती स्थापन झाली. २०१३ मध्ये केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सोलापूरच्या परिवहन विभागात १४४ नवीन गाड्या आल्या. त्यामध्ये १० वोल्वो, ३५ मिनीबस, ९९ जनबसचा समावेश होता. अवघ्या नऊ महिन्यांतच यातील ९९ बसेसच्या चीसी क्रॅक असल्याचे आढळून आले. त्यावेळी साधारण २०१५ ते २०१६ च्या दरम्यान सुमारे १२५ बसगाड्या रस्त्यावर धावत होत्या. टप्प्याटप्प्याने गाड्या कमी होत गेल्या.
खाजगीकरण विषयी माहिती देताना आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले की, शहरातील बससेवेच्या मार्गांची यादी करून त्याचे चार भाग केले जाणार आहेत. या चार भागांपैकी एक भाग महापालिका परिवहन विभागासाठी ठेवणार आहे. त्या भागावर परिवहन विभागाकडे जेवढ्या बसगाड्या आणि कर्मचारी आहेत तेथे ते काम करतील. उर्वरित तीन भागांचे खासगीकरण केले जाणार आहे. खासगीकरण केले तरी प्रवासाचे तिकीट दर महापालिकाच ठरवणार आहे. त्यामुळे प्रवाशांची लूट होणार नाही. बस गाड्यांमुळे प्रवाशांना कमी पैशात प्रवास मिळेल. खासगीकरण केल्यानंतर वेळेवर आणि सुरळीत बससेवा मिळणे गरजेचे आहे, असेही आयुक्त यांनी सांगितले.
चांगला अधिकारी मिळाला तर परिवहन उपक्रम नीट चालतो आणि नफ्यात येतो हा अनुभव सोलापूरकरांनी घेतला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून राजेंद्र मदने २००९ ते २०१० पर्यंत सोलापुरात कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्याकडे परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी होती. त्यांनी शहरातील विनापरवाना रिक्षांवर कडक कारवाई केली. त्यामुळे अशा रिक्षांची संख्या कमी झाली आणि प्रवासी संख्या महापालिकेच्या बसमध्ये वाढली. त्यामुळे त्यांच्या काळात परिवहनला ऊर्जितावस्था प्राप्त झाली होती. या नंतरच्या काळात मात्र परिवहन ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत.
0 Comments