व्यापारी एकता दिनानिमित्त सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर व्यापारी एकता दिनानिमित्त सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व व्यापारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला व्यापारी बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला. ६१ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.भुसार आडत व्यापारी संघाच्या कै.विश्वनाथप्पा भोगडे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्कळी यांनी केलेल्या प्रास्ताविकात व्यापार करत असताना व्यापाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत व्यापारी बांधवांकडून रक्तदानासारखे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. त्याच बरोबर आडत व्यापारी वर्गांच्या अडीअडचणीबाबत विचार व्यक्त केले . यावेळी सिध्दय्या स्वामी हिरेमठ, रियाज बागवान यांनीही मनोगत व्यक्त केले केले. प्रमुख वक्ते सीए श्रीधर रिसबूड यांनी इन्कम टॅक्स जीएसटी व टीडीएस या कायद्यातील असलेल्या तरतुदीचे महत्त्व व्यापारी वर्गांनी याबाबत जागरूकतेने कामकाज करण्यासंबंधी अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केले . तसेच कायद्यातील तरतुदीचे पालन करण्यासंबंधी माहिती विषद केली. यावेळी विजयकुमार देशमुख यांनी संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून व्यापारी एकता दिनानिमित्त शुभेच्छादिल्या. अडीअडचणी सोडवून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.व्यापारी एकता दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीत ६१ जणांचे रक्तदान.
0 Comments