महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांसह विविध विभागातील माजी अधिकाऱ्यांची नामफलके देखील भंगार मध्य

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांतील विविध विभागातील न लागणारी वस्तू साहित्य आणि भंगार बाहेर काढून हे भांडारामध्ये टाकले आहे.यासोबतच महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांसह विविध विभागातील माजी अधिकाऱ्यांची नामफलके देखील भांडारमधील भंगार मालाच्या ढिगाऱ्यात टाकली आहेत.यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या नामफलकाची अप्रतिष्ठा होत असल्याची चर्चा मात्र महापालिकेत रंगली आहे.महापालिका प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांतील विविध जुने साहित्य व भंगार माल महापालिका कौन्सिल हॉल इमारती मागे असलेल्या भांडार परिसरात टाकले आहे. जुनी वाहने लोखंडी साहित्य व अन्य साहित्यासह भंगार विक्रीसाठी काढले.यासाठी महापालिका सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार भंगार विक्रीची निविदा देखील काढली.सुमारे ५ ते ६ कोटींचे हे भंगार साहित्य मक्तेदाराला देण्यात आले आहे. मात्र यामध्ये महापालिका प्रशासनाला लागणारी काही महत्त्वाची साहित्ये, उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू भंगारात जाण्यासाठी महापालिकेच्या भांडारात अस्ताव्यस्त पडून आहे.महापालिकेच्या माजी सहाय्यक आयुक्तांसह काही अधिकाऱ्यांच्या नामफलकाचे अप्रतिष्ठा,अनादर झाल्याचा प्रकार महापालिका आवारात दिसून आला.
कार्यालयांवर लावलेला नामफलक हा संबंधित अधिकाऱ्यांची एक ओळख आणि प्रतिष्ठा मानली जाते. मग तो विद्यमान असो, अथवा माजी किंवा निवृत्त.प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यकाळात विशिष्ट अशा कार्याचा ठसा उमटवलेला असतो.याकडे संबंधित विभाग आणि भांडारमधील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्याचे सांगून अधिकाऱ्यांच्या नावाचा अनादर टाळावा, अशी मागणी महापालिकेच्या वर्तुळातून होत आहे.
0 Comments