Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर व समर्थकांच्या शुभेच्छा

राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर व समर्थकांच्या शुभेच्छा

             मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर व समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून व फोनवरून शुभेच्छा दिल्या. तसेच संध्याकाळी सोलापूर येथे कुटुंबासमवेत केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांचे सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय आहे. त्यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सर्व क्षेत्रातील हितचिंतक व त्यांच्या समर्थकांनी सकाळपासून मंगळवेढा येथील दि. १८ मे रोजी सावली निवासस्थानी समर्थकांनी केक कापून शुभेच्छा दिल्या. यावेळी

             धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, श्रीरंग काटे,रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप,माजी सभापती प्रवीण खवतोडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पी.बी. पाटील,शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, अरुण किल्लेदार, मुझफर काझी, ज्ञानेश्वर भगरे, हर्षद डोरले, विश्वंभर काळे,चिदानंद माळी, भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, शहराध्यक्ष गोपाळ भगरे, शशिकांत चव्हाण, येताळा भगत,आदित्य मुदगुल, प्रकाश काळुंगे, तात्या वाकडे, मुरलीधर घुले, जमीर शेख,प्रवीण उगाडे, जनार्धन अवघडे, बापू अवघडे, राजेंद्र सुरवसे, अशोक माळी,विजय बुरकुल, राजाराम सूर्यवंशी,प्रकाश खंदारे आदींनी शुभेच्छा दिल्या.तसेच सोलापूरचे माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, पंढरपूरचे डॉ.बी.पी.रोंगे यांनी देखील प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. सोलापूर येथील निवसासस्थानी संध्याकाळी बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे, सूत गिरणीचे माजी चेअरमन अभिजीत ढोबळे,शेरॉन ढोबळे,अजय साळुंखे,क्रांतीताई आवळे,अब्राहम आवळे,शाहू आवळे,नोहा आवळे,वसुंधरा साळुंखे,विनय साळुंखे,विशाल खंदारे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments