राज ठाकरेंचा दौरा रद्द

मुंबई, (नासिकेट पानसरे): प्रतिनिधी - राज ठाकरे ५ जूनला अध्योध्येला जाणार होते. मात्र, त्यांच्या हा दौरा काही कारणामुळे स्थगित करण्यात आलाय. याबाबत राज ठाकरे यांनी ट्विट करत याची माहिती दिली. त्यांच्या या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे खासदार कडाडून विरोध करीत आहेत त्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापायला लागले होते. आता हाती आलेल्या वृत्तानुसार त्यांचा हा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. येत्या पाच जूनला राज ठाकरे अयोध्या दौरा करणार होते. पण राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. राज ठाकरे यांचा दौरा तुर्तास रद्द केला असला तरी खासदार ब्रजभुषण सिंह यांचा विरोध अद्यापही कायम आहे. इतकेच नव्हे तर हिंदी भाषिक राज्यातूनही मोठ्या प्रमाणात विरोध वाढत आहे.
मनसेकडून मुंबईत पोस्टरबाजी
यावर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मनसेने दिला होता. या संदर्भातले बॅनर मुंबईतल्या लालबाग परिसरात लावण्यात आले होते. या बॅनरमुळे आता मनसेही उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं पाहिला मिळत होते. मात्र, हा दौरा स्थगित झाल्याने वादावर तात्पुरता तोडगा पडला आहे.
राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्याच्या निमित्ताने मनसे अयोध्या आणि शरयू नदीकाठी शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. या दौऱ्यासाठी मुंबई,ठाणे, नाशिक, पुणे आणि राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते अयोध्येत जाणार होते. यासाठी मनसेतर्फे १० ते १२ रेल्वे गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. दौऱ्या आधी मनसेचं एक शिष्टमंडळही अयोध्येला रवाना होणार होते.
0 Comments