Hot Posts

6/recent/ticker-posts

रक्तदान शिबिर आयोजित करून मनसेने पार पाडली सामाजिक जबाबदारी

 रक्तदान शिबिर आयोजित करून मनसेने पार पाडली सामाजिक जबाबदारी


पुणे (अनिकेत मुळीक):-तीर्थ क्षेत्र थेऊर चिंतामणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरपरिसरातील 19 मे 2022 रोजी 9 ते 3 यावेळेत शिबिर आयोजित करण्यात आले तर्पण ब्लड बँक यांना रक्त दात्यानी रक्त दान करून भरघोस प्रतिसाद दिला.आपल्या रक्तदान मुळे  एखाद्याचे प्राण आपण वाचवू शकतो ही कल्पनाच निखळ समाधान देणारी असे मत मनसे हडपसर विभागीय आध्यक्ष सीमा काकडे यांनी मांडली या कार्यक्रमामध्ये मावली आबा कुंजीर- पुणे जिल्हा स्वराज संघ, लक्ष्मण चव्हाण ग्राहक फाउंडेशन आध्याक्ष हवेली तालुका, ऋषिकेश तारू मनविसे विभाग आध्यक्ष्य, आनंदा काकडे-थेऊर भजनी मंडळ आध्यक्ष, सावित्री सूर्यवंशी ग्राहक कल्याण फाउंडेशन महिला मंच ,अनिकेत मुळीक तसेच इच्छुकांनी रक्तदान करून समाज सेवेस हातभार लावला  मनसे नेते बाप्पु सोनवणे या बद्दल आभार व्यक्त केले असुन आधिक माहिती साठी विश्र्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर तर्पण ब्लड बँक व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी संपर्क जनसंपर्क अधिकारी- प्रविण नवले मो.9359400848 संपर्क साधावा.

Reactions

Post a Comment

0 Comments