कोल्हापूर, मिरज, परळी, बिदर सोलापूर रेल्वे सेवा पूर्ववत कराव्यात - शहीद अशोक कामटे संघटना

सांगोला स्टेशनवर एक्सप्रेस रेल्वेचे तिकीट विक्री सुरू करावी
सांगोला (कटुसत्य वृत्त): टाळेबंदी उठविल्यानंतर रेल्वे गाड्या पुन्हा सुरू झाल्या पण कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे त्या पूर्ण क्षमतेने सोडल्या नाहीत काही एक्सप्रेस आणि बहुतांश पॅसेंजर गाड्या अजूनही रुळावर आलेल्या नाहीत. या सर्व रेल्वे गाड्या तात्काळ सुरू कराव्यात अशा मागणीचे पत्र शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने रेल्वे विभाग सोलापूर यांना देण्यात आले आहे. विशेषता मिरज ते सोलापूर या मार्गावरील सर्व पॅसेंजर एक्सप्रेस या अद्यापही यार्डातच आहेत.
गाडी क्रमांक 22155 सोलापूर ते मिरज एक्सप्रेस ,22133 सोलापूर -कोल्हापूर एक्सप्रेस ,54125 परळी- मिरज पॅसेंजर, 22145 पंढरपूर- मिरज सुपरफास्ट एक्सप्रेस, कोल्हापूर- बिदर यासह सर्व अप- डाउन रेल्वे गाड्या बंद असून त्यामुळे येथील विद्यार्थी ,पालक ,व्यवसायिक ,नोकरदार यांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सोलापूर रेल्वे विभागात सर्वत्र गाड्या सुरू होत असताना या भागातील रेल्वेसेवा सुरुहोण्या करता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे ,त्यात सांगोला रेल्वे स्टेशन वर एक्सप्रेस गाड्यांची सामान्य तिकीटे मिळत नाही कोरोनाच्या काळात फक्त आरक्षित तिकीट विक्रीची सेवा घेऊनच प्रवास करता येत होता तीच पद्धत आज पर्यंत रेल्वे प्रशासनाने सुरू ठेवल्याने रेल्वे स्टेशन किंवा या गाड्यांना कोणताही फायदा प्रवाशांना होताना दिसत नाही. 24 तासात एखादी दुसरी गाडी थांबते आहे एरवी दिवसभर स्थानकांमध्ये शुकशुकाट असतो स्टेशन मास्तर आणि एक-दोन कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त कोणीही येत नाही त्यामुळे रेल्वेचे प्रचंड नुकसान होत आहे शिवाय प्रवाशांची गैरसोय होत आहे सोलापूर ते मिरज या रेल्वे मार्गावर दिवसभरात पाच हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करतात या सर्वांना आता एसटी किंवा खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. या निवेदनाच्या प्रती जनरल मॅनेजर मुंबई खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर ,खा. डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांनाही या निवेदनाच्या प्रती देऊन या समस्येविषयी माहिती शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने देण्यात आली.
कोरोना गेला रेल्वे कधी सुरू होणार?
सध्या कोरोनाची साथ कमी झाल्याने गाड्या सुरु होण्या करिता शहर व परिसरातील 790 विद्यार्थी, नागरिक, प्रवाशांनि गाडी सुरू करणेबाबत स्वाक्षरी पत्र सोबत जोडून रेल्वे विभाग सोलापूर यांना दिले आहे. गाड्या सुरू कराव्यात अन्यथा आंदोलन करावे लागेल.
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना,:- संस्थापक निळकंठ शिंदे सर ,सांगोला
0 Comments