लोणविरे येथे खरीप हंगाम पुर्व नियोजन तयारी मार्गदर्शन संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) कृषी विज्ञान केंद्र मोहोळ ,तालुका कृषी अधिकारी कार्यालय सांगोला, लोणविरे ग्रामपंचायत व सृष्टी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पूर्वनियोजन तयारी , पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन व शिवार फेरी याचे आयोजन करण्यात आले होते , श्री महादेव संभाजी गायकवाड यांचे उन्हाळी मुग व उन्हाळी तीळ पिकाची पाहणी करण्यात आली, यावेळी डॉक्टर तानाजी वळकुंडे, डॉक्टर शरद जाधव, तालुका कृषी अधिकारी श्री शिवाजी शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी , कृषी अधिकारी भंडारे साहेब, कृषी सहाय्यक शिवाजी बर्गे उपस्थित होते.
0 Comments