सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या बी.फार्मसी विद्यार्थ्यांची फार्मसी कंपनीला भेट

सोलापूर, (कटुसत्य वृत्त): सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे या महाविद्यालयातर्फे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार नियोजनानुसार बी.फार्मसी तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी यूव्ही आयूर्जन फार्मा पीव्हीटी एलटीडी, सातारा व डायनॅमिक रेमिडीज पीव्हीटी एलटीडी,सातारा या कंपनीस भेटी दिल्या. सकाळी महाविद्यालयातून विद्यार्थी सहलीस रवाना झाले. उत्साहपूर्ण वातावरणात फार्मसी प्रश्नमंजुषा खेळत विद्यार्थी एम.आई.डी.सी.सातारास पोहंचले. महाविद्यालयातर्फे डायनॅमिक रेमिडीज व यूव्ही आयूर्जन फार्मा कंपनीचे श्री.एन.बी.लिमये व श्री.प्रदीप पाटील यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. कंपनीचे श्री.एन.बी.लिमये व श्री.प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कंपनीची सर्व माहिती दिली.तसेच फार्मासिस्टचे फार्मा कंपनीतील महत्व,कार्य,व्याप्ती याबद्दल माहिती दिली.फार्मासिस्ट याना भविष्यात करियरच्या भरपूर संधी आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे ग्रुप करून त्यांनी कंपनीतील सर्व विभागास भेटी दिल्या.कंपनीत औषधे कशी बनवतात,औषधे बनवणारी यंत्रसामुग्रि, त्याचे गुणनियंत्रण व लॅब, लेबलिंग, पॅकिंग, स्टोरेज याबद्दल सर्व माहिती घेतली.
0 Comments