शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार समायोजन प्रक्रिया राबवा

खाजगी शाळा कृती समितीची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सन २०१६-१७ व २०१७-१८ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रिया शिक्षण संचालक यांच्या आदेशानुसार राबविण्यात यावी. मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.किरण लोहार यांच्याकडे केल्याची माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली. डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,महाराष्टृ राज्य शिक्षक सेना,युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.किरण लोहार यांची भेट घेऊन निवेदन दिले.या शिष्टमंडळात सुनिल चव्हाण,अप्पाराव इटेकर,विनोद आगलावे,मुरलीधर कडलासकर,अ.गफुर अरब,सचिन चौधरी,संतोष माशाळे, दिपक डांगे,अप्पासाहेब विंचुरे,जयंत गायकवाड,काशिनाथ बडुरे,दर्शन जवळकोटे,अशोक मंजेली,आनंद येळमेली आदी सहभागी होते.सन २०१६-१७ व २०१७-१८ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे (२३ व ७०) जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते.ही समायोजन प्रक्रिया बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात आली होती.या नियमबाह्य समायोजनाविरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने तीन दिवस धरणे अंदोलन करण्यात आले होते.समायोजन प्रक्रिया राबविताना शासन निर्णयाचा भंग झाल्याचा अहवाल शिक्षण आयुक्त यांना देण्यात आला.शिक्षण संचालकांनी या २३ व ७० शिक्षकांचे होकार व नकार घेऊन समायोजन करण्याचे आदेश २४ डिसेंबर २०१९ रोजी दिले होते.शिक्षण संचालकाचे आदेश डावलुन सन २०२०-२१च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या यादीत त्या २३ व ७०शिक्षकांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.त्यामुळे शिक्षण संचालकांनी पुन्हा ९ मे २०२२ रोजी त्या शिक्षकांचे होकार नकार घेऊनच समायोजन प्रक्रिया राबविण्याचे पुन्हा आदेश दिले आहेत.शिक्षण संचालकांच्या आदेशानुसारच पारदर्शकपणे समायोजन प्रक्रिया राबविण्यात यावे.अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.याबाबत माहीती घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षणाधिकार्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
0 Comments