जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 ISO मानांकित
सोलापूर (कटुसत्य वृत्त): सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक या संस्थेस आय एस ओ 9001:2015 मांनाकान मिळाले असून त्याचे प्रमाणपत्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते हुतात्मा स्मृती सभाग्रहात प्रदान करण्यात आले .
याप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन श्रीमती चंचल पाटील,इशाधिन शेळकंदे , स्मिता पाटील , माजी अध्यक्ष बळीराम काका साठे , वैशाली सातपुते, सुमन नेहतराव, डॉ.निशिगंधा माळी , जयमाला गायकवाड ,बाबुराव जाधव ,शिवानंद पाटील, अनिरुद्ध कांबळे, सर्व खाते प्रमुख ,गटविकास अधिकारीआदी उपस्थित होते. प्रमाणपत्र पतसंस्थेचे चेअरमन हरिबा सपताळे यांच्याकडे सुपूर्त करून संस्थेचे अभिनंदन करीत संस्थेचे कामकाज यापेक्षा अधिक प्रगतीपथावर जावे अशा शुभेच्छा पालक मंत्री महोदय यांनी दिल्या .याप्रसंगी मार्गदर्शक पंडित भोसले, दयानंद परिचारक, व्हाईस चेअरमन धन्यकुमार राठोड, ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज, श्रीशैल देशमुख, दीपक घाडगे, दत्तात्रय घोडके, अनिल जगताप, शाजाहान तांबोळी, सुहास चेलेकर, सुंदर नागटिळक, विष्णू पाटील , डॉ. एस.पी. माने ,त्रिमूर्ती राऊत ,सुखदेव भिगे , मृणालिनी शिंदे,सुनंदा यादगिरी, शेखर जाधव ,संस्थेचे सचिव दत्तात्रय देशपांडे आदी उपस्थित होते.
0 Comments