सोलापूरात नव्या संभाजी महाराज जयंती मध्यवर्ती महामंडळाची स्थापना...
अध्यक्ष, कार्याध्यक्षांसह नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवासाठी नव्याने मध्यवर्ती महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ असे या नव्या मध्यवर्ती उत्सव समितीचे नाव आहे. यामध्ये एकूण 24 महामंडळांचा समावेश असणार आहे. याबाबतच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवडीची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत मध्यवर्ती महामंडळाच्या 2022 सालच्या उत्सव अध्यक्षपदी अभिजीत सोनके, कार्याध्यक्षपदी निशांत सावळे, उपाध्यक्षपदी प्रवीण माने, सचिव अभिषेक गुंड, खजिनदार युवराज माने, प्रसिध्दी प्रमुख पदी ज्योतिबा गुंड आदींची निवड करण्यात आली आहे.
त्याचबरोबर मध्यवर्ती महामंडळाच्या सल्लागार समन्वयक समितीमध्ये श्रीकांत डांगे, राम जाधव, सागर शितोळे, बापू वाडेकर, प्रसाद लोंढे, किरण पवार, अक्षय सुर्यवंशी, सोमनाथ राऊत, प्रशांत बाबर, आनंद कोलारकर, अक्षय जाधव, मनीष काळजे, मारुती सावंत आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
या मध्यवर्ती महामंडळाच्या स्थापनेची बैठक सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक राजन जाधव, लहू गायकवाड, श्रीकांत घाडगे, अनंत जाधव तसेच शहरातील 24 छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते.
- छत्रपती संभाजी महाराज जयंती मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून शनिवारी शहरातील विविध भागातून छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त जंगी मिरवणूक निघणार आहेत. एकूण 24 मंडळांची या मिरवणुकीत हजेरी असणार आहे.
0 Comments