Hot Posts

6/recent/ticker-posts

लक्ष्मीनगर येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

लक्ष्मीनगर येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पारंपरिक "लांडगे खेळाचा" कार्यक्रम होणार संपन्न

              सांगोला(जगन्नाथ साठे): लक्ष्मीनगर ता. सांगोला येथील ग्रामदैवत लक्ष्मी देवीची यात्रा या वर्षी अतिशय दिमाखात आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साही वातावरणात संपन्न होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.

              गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लक्ष्मी देवीची यात्रा रद्द करण्यात आली होती. पण या वर्षी मात्र मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न होणार आहे. या वर्षी यात्रेनिमित्त राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा,ऑर्केस्ट्रा, आणि कुस्त्याचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे.सोमवार दि 16 मेला राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा,17 मे ला पारंपारिक लांडगे खेळण्याचा कार्यक्रम तर  18 मे ला दुपारी तीन वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार असून या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments