टेंभुर्णी बस स्थानकावरून महिलेचे दागिने लांबवले
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी तालुका माढा येथील बस स्थानकावरून प्रवासी महिलेच्या पर्समधून १ लाख ९५ हजार रुपयाचे दागिने लांबवल्याची घटना घडली असून.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की तेजमाला काकासाहेब मुटाळ (वय ३७ रा.खामगाव तालुका बार्शी) या पती, सासू-सासरे व दोन मुलींसोबत श्रीपुर वरून टेंभुर्णी या ठिकाणी बार्शीला जाण्यासाठी आल्या होत्या. टेंभुर्णी येथून पुणे-औसा बस मध्ये चढल्यानंतर तेजमाला मुटाळ यांनी तिकीट काढण्यासाठी कंडक्टरला तिकिटाचे पैसे देण्यासाठी पर्सचे मध्ये पाहिले असता त्यांना पर्समध्ये छोट्या पाकिटात ठेवलेले ३ तोळ्याचे सोन्याचे गंठण, १ तोळ्याची सोन्याची चैन तसेच कानातील कर्णफुले व इतर सोन्याचे दागिने ठेवलेले छोटे पाकीट त्या पर्समध्ये नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे येऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध १लाख ९५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद दिली असून. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गोळे हे करीत आहेत.
0 Comments