सांगोल्यात भारतीय जनता युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न

सांगोला (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली. या बैठकीत चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार तेजस्वी सूर्या यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संघटनात्मक बैठक संपन्न झाली. या बैठकीत चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत दौरा यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश प्रभारी गणेश कुटे, प्रदेश सहप्रभारी पंडित भुजवन, प्रदेश सचिव दीपक चव्हाण, सुजित थिटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव, प्रदीप पाटील, विकास वाघमारे, रणजित जाधव, सहकार विभाग संयोजक सत्यजित सुरवसे, गजानन भाकरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, शहर अध्यक्ष प्रवीण जानकर, मानस कामलापूरकर, सिद्धेश्वर गाडे, अजित तवते, विकास वलेकर, अमोल मोहिते, ओंकार कुलकर्णी, सुरेश बुरांडे, सुरेश इंगोले, राहुल केदार, रमेश विटेकर, गणेश केदार, बाळासो चव्हाण इत्यादी युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments