तहसिल कार्यालयात ध्वजारोहण संपन्न
.jpeg)
.jpeg)
पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजारोहण सोहळयास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पंडीत कोळी, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे, पं.स.माजी सभापती अरुण घोलप, माजी सदस्य प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस पथकांनी मानवंदना दिली. याप्रसंगी स्वांतत्र्यसैनिक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील आयएसओ 9001-2015 मानांकन झालेल्या रेशनदुकान चालकांचा प्रमाणपत्र देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान यावेळी करण्यात आला.
0 Comments