Hot Posts

6/recent/ticker-posts

मौलाना आझाद पॉलिटेक्निक मध्ये कमिन्स इंडिया MNC द्वारे मुलाखती संपन्न

मौलाना आझाद पॉलिटेक्निक मध्ये कमिन्स इंडिया MNC द्वारे मुलाखती संपन्न


          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मौलाना आझाद पॉलिटेक्निक मध्ये प्लेसमेंट साठी TPO विभागाच्या वतीने पुणे येथील नामवंत कंपनी कमिन्स इंडियाद्वारे पूल कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले.

          यावेळी शहरातील विविध पॉलिटेक्निक महाविद्यालयातील सुमारे 450 विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कमिन्स इंडिया कंपनीचे HR व्रेग फ्रान्ससिस , चंदन कणसे, शहबाज खान यांच्यासोबत 5 HR नी विद्यार्थ्यांची मुलाखती घेतल्या. या मुलाखती 5 व 6 तारखेला संपन्न झाल्या. 450 विद्यार्थ्यांमधून सुमारे 105 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर कॅम्पस मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन आमिरोद्दीन शेख सर यांनी केले. 

          मुलाखती व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्राचार्य सर्फराज शेख , TPO रोहन कुर्री, हलोळे, जमादार , केल्लूरकर, अमरीन शेख, अतिया शेख, फरीदा नदाफ, हंगळगी सर, झैद जमादार, धवाटे व इतर प्राध्यापकांनी मेहनत घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments