"ईडी जिसकी मम्मी है, ओ सरकार निकम्मी है" आ.प्रणिती शिंदें मोदी सरकारवर आक्रमक
राज्यामध्ये ईडीच्या वतीने ज्या कारवाया होत आहेत त्याकडे लक्ष वेधत आमदार प्रणिती शिंदे यांनी "ED जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है" अशी नवी घोषणा दिली, या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, दरम्यान माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे असताना गॅस सिलेंडर केवळ चारशे रुपये होता त्यावेळी भाजपने त्यांना बांगड्या पाठवल्या आता आम्ही यांना काय पाठवायचे? असा प्रश्न उपस्थित करत ईडीच्या ज्या कारवाया सुरू आहेत त्यावरून भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचे सिद्ध झाले आहे अशी टीका त्यांनी केली.
0 Comments