रेल्वे प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटवण्यासाठी कल्याण नगरातील नागरिकांना नोटिसा पाठविल्या
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ते होटगीदरम्यान जुन्या मीटर गेजच्या जागेत गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण करून, पत्र्याचे शेड उभारून जागा लाटण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला. रेल्वे प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, जागेची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. उशिरा का होईना रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली असून,काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने कल्याण नगरातील नागरिकांना नोटीस पाठविल्या आहेत.शहरातून रेल्वे मार्ग जात असल्याने अनेक वेळा वाहतुकीची कोंडी व्हायची.अतिक्रमण सोलापूर ते होटगीदरम्यान पूर्वी संभाजी तलावापासून जुनी मीटर गेजची सेवा सुरू होती. त्यामुळे रेल्वे विभागाने १९९८ मध्ये जुनी मीटर गेज सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेची ही हेक्टरची जागा १९० आता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. दरम्यान, कल्याण नगर परिसरात सर्वाधिक घरे आसरा पुलाखालच्या रेल्वेच्या जमिनीवर आहेत.रेल्वेकडून जागेची मोजणी सुरू झाली असून किती जागेवर अतिक्रमण झाले याबाबतचीही माहिती घेतली जात आहे, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
0 Comments