Hot Posts

6/recent/ticker-posts

एसपी तेजस्वी सातपुतेंचे ‘ऑपरेशन परिवर्तन’! लोकसभेत खासदार सुप्रिया सुळेंकडून कौतूक

एसपी तेजस्वी सातपुतेंचे ‘ऑपरेशन परिवर्तन’! लोकसभेत खासदार सुप्रिया सुळेंकडून कौतूक

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील हातभट्टी दारु निर्मिती व विक्री बंद झाल्यास गुन्हेगारी कमी होइल, असा विश्वास बाळगून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात ‘ऑपरेशन परिवर्तन’ पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबविले. त्यातून त्यांनी त्या लोकांचे समुपदेशन व पुनर्वसन केले. १८ महिन्यात ६०४ जणांनी तो व्यवसाय सोडून समाजमान्य व्यवसाय सुरु केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर लोकसभेत केले.

          मुळेगाव तांड्याची ओळख वर्षानुवर्षे हातभट्टी दारू निर्मितीचे गाव, अशीच होती. कायदा पायदळी तुडवून पिढ्यान्‌पिढ्या अवैध व्यवसाय करणाऱ्यांचीही मुले शिकून मोठी होऊ शकतात, तेही अधिकारी बनू शकतात हा आत्मविश्वास पोलिस अधीक्षकांनी सुरवातीला त्या लोकांमध्ये निर्माण केला. पण, केवळ समुपदेशनाने काहीच होणार नाही, याची जाणीव ठेवून त्यांनी तो व्यवसाय मुळासकट बंद होण्यासाठी सहकाऱ्यांच्या मदतीने एक कृती आराखडा तयार केला आणि त्याला ‘आपरेशन परिवर्तन’ असे नाव दिले. हातभट्टी बनविणारी गावे व ती दारू विकली जाणाऱ्या गावांचा सर्व्हे झाला. त्यानंतर ६० गावांमध्ये तयार होणारी हातभट्टी दारु परिसरातील १२४ गावांमध्ये विक्री होते, हे लक्षात आले. त्यांनी प्रत्येक गाव आपल्या अधिकाऱ्यांना दत्तक दिले. आठवड्यातून तीनवेळा वेगवेगळ्या दिवशी त्याठिकाणी छापे टाकल्याने नफ्यापेक्षा तोटाच अधिक होऊ लागला. त्यावेळी त्या लोकांनी हा व्यवसाय बंद करून नवा व्यवसाय करण्याची तयारी दर्शविली. त्यातून जवळपास सहाशे व्यक्तींनी तो अवैध व्यवसाय सोडला आहे.

कसे केले ‘ऑपरेशन परिवर्तन’
१) छापे : हातभट्टी दारु बनविणारे अड्डे व विकणाऱ्यांवर सातत्याने टाकले छापे
२) समुपदेशन : कायद्याने काय कारवाइ होऊ शकते, अवैध व्यवसायात कुटुंबाची वाताहात कशी होते, याची माहिती पटवून दिली
३) पुनर्वसन : अवैध व्यवसाय सोडणाऱ्यांना पर्यायी व्यवसाय रोजगार मिळावा म्हणून यशस्वी प्रयत्न, त्यांच्या मुलांसाठी नोकरी मेळावा
४) जागृती : हातभट्टी दारु पिणारे कमी झाल्यास हा व्यवसाय बंद होईल म्हणून पिणाऱ्यांमध्ये जागृती करून त्यांना परावृत्त केले.


Reactions

Post a Comment

0 Comments