Hot Posts

6/recent/ticker-posts

रयत क्रांती संघटनेचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी उपमुख्यमंत्र्यांना साकडे - प्रा सुहास पाटील

रयत क्रांती संघटनेचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी  उपमुख्यमंत्र्यांना साकडे - प्रा सुहास पाटील

           बेंबळे (कटुसत्य वृत्त): सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी चालू हंगामातील ऊस बिले दिलेली नाहीत, या मागणीसह अनेक मागण्यांचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील यांनी दिले.

           सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा आले असता, शेटफळ चौक येथे रयत क्रांती संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले,नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या द्राक्ष बागांचे त्वरीत पंचनामे करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयाचे अनुदान मंजूर करावे.,जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत ऊसबिले त्वरित द्यावीत,. शेतकऱ्यांना शेतातील पीकासाठी दिवसा सुरळीत सलग आठ तास वीज पुरवठा देण्यात यावा,. या व इतर कांही शेतकरी संमंधीत प्रश्नांचे निवेदन प्रा सुहास पाटील यांनी ऊपमुख्यमंत्री अजित दादांच्या गाडीचा ताफा थांबवून दिले., सलग दहा ते बारा मिनिट सर्वांच्या बरोबर  आस्थेवाईकपणे चर्चा करून, त्यावर योग्य ते निर्णय घेतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासन दिले. या प्रसंगी मोहोळचे आमदार यशवंत माने,रयत क्रांतीचे बांधकाम कामगार तालुकाध्यक्ष संजीव शिंदे, मोडनिंब ग्रा पं सदस्य अमर ओहोळ, रयत क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार लादे, बालाजी वाघमारे, दीपक ओहाळ, प्रा पी बी भांगे,सतिश सुर्वे व भागातील शेतकरी आदीजण उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments