सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या डी.फार्मसी विद्यार्थ्यांची जलशुद्धीकरण केंद्र शिरभावीस भेट

सांगोला, (कटुसत्य वृत्त): सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे या महाविद्यालयातर्फे जलशुद्धीकरण केंद्र शिरभावीस भेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार नियोजनानुसार डी.फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रजीवन प्राधिकरण उपविभाग शिरभावीच्या जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली.सामाजिक फार्मसी विषयांतर्गत क्षेत्र भेट म्हणून शिरभावीच्या जलशुद्धीकरण केंद्रास विद्यार्थ्यांनी भेट दिली. केंद्र शाखा अभियंता श्री.चंद्रकांत कोळी,उप-अभियंता श्री.दत्तप्रसाद नगरकर व त्यांचे सहकारी श्री.गणेश ढोले, श्री.भीमराव मोरे या सर्वानी विद्यार्थ्यांचे स्वागत करून माहिती दिली.
या भेटीत विद्यार्थ्यांनी जलशुद्दीकरण प्रक्रियेबद्दल सर्व माहिती जाणून घेतली तसेच त्यासाठी लागणारे उपकरणे,रसायने व प्रक्रिया याबद्दल माहिती संग्रहित केली.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नास समर्पक उत्तरे उपस्थित अधिकारी वर्गाने दिली त्याबद्दल सर्वानी त्यांचे आभार मानले. हि भेट यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील, प्रा.आर.एम.कोळी, प्रा.व्ही.पी.आणेकर,प्रा.एस.एम.
0 Comments