पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

पंढरपुर (कटूसत्य वृत्त):- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१३ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहीमेत १०० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला. हा घोटाळा करून किरीट सोमय्या यांनी देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी प्रतरणा केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करा अशी अशी मागणी करीत आज पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारो अंदोलन करून करण्यात आली.
यावेळी बोलताना शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी भाजपचा नेता किरीट सोमय्यानी देशभक्त असल्याचा आव आणत सामान्य जनतेला विक्रांत या विमानवाहू बलाढ्य जहाजाचे जतन केले जाणार असल्याचे सांगत लोकांना थापा मारून कोट्यवधी रुपये गोळा केले आणि त्यातून किरीट सोमयाचा मुलगा निल सोमय्या याच्या निकॉन या कंपनीत हा पैसा वळविला.अशा गद्दार व देशद्रोही किरीट सोमय्यास तात्काळ अटक करून तुरुंगात टाका. अशा देशद्रोही किरीट सोमय्यास केंद्र सरकारने दिलेले विशेष दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात यावी,जनतेच्या करातून जमा झालेला पैसा अशा देशद्रोहीस संरक्षण पुरविण्यासाठी वापरणे चुकीचे आहे,भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा यातून पुढे आला आहे आणी शिवसेना भाजपचा बुरखा फाडल्याशिवाय रहाणार नाही अशीही प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसेना पंढरपूर विभाग प्रमुख संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख महावीर देशमुख व युवती सेना प्रमुख पूनम अभंगराव यांनीही किरीट सोमय्याच्या कृतीचा जोरदार निषेध करत तातडीने अटक करण्याची मागणी केली.
यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,शहर प्रमुख रवी मुळे,तालुका प्रमुख महावीर देशमुख,युवती सेना तालुका प्रमुख पूनम अभंगराव,शहर प्रमुख पूर्वा पांढरे,संगीता पवार,सिद्धनाथ कोरे,जयवंत माने,माउली आष्टेकर,संतोष धोत्रे,कल्याण कवडे,उमेश काळे,विलास चव्हाण,बाळासाहेब पवार,अर्जुन भोसले,विनायक वनारे,पोपट सावंतराव,तानाजी मोरे,अविनाश वाळके,चेतन नेहतराव,महावीर अभंगराव,सचिन बंदपट्टे,ईश्वर साळूंखे,सूरज गायकवाड,लंकेश बुराडे,रणजित कदम,सुधाकर माळी,संजय पवार,अर्जुन भोसले यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments