पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून ) मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 07.00 वा. पुणे येथून सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.05 वाजता नियोजन भवन येथे सोलापूर जिल्हा प्रमुख प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता स्मार्ट सिटी प्रकल्प प्रमुख अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक. दुपारी 1.30 ते 2.45 राखीव.
दुपारी 2.45 वा. सोलापूर येथून वळसंग ता. अक्कलकोटकडे प्रयाण. दुपारी 3.15 वळसंग येथे आगमन व वळसंग विहीर (विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केलेली ऐतिहासिक विहिर) सुशोभिकरण कामाचे भूमीपूजन. दुपारी 3.30 वा. वळसंग येथून देशमुख बोरगाव ता. अक्कलकोटकडे प्रयाण. सायंकाळी 4 वा. देशमुख बोरगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन /भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायं 5 वा. अक्कलकोट येथे आगमन व माजी राज्यमंत्री श्री. सिध्दाराम म्हेत्रे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला उपस्थिती. सायं 5.30 वा. अक्कलकोट जि.सोलापूर येथून भरणेवाडी, ता.इंदापूरकडे प्रयाण.
0 Comments