खासगी चारचाकी वाहनांद्वारे बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 8, 2022

खासगी चारचाकी वाहनांद्वारे बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

खासगी चारचाकी वाहनांद्वारे बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

            पुणे (कटूसत्य वृत्त): खासगी चारचाकी वाहनांद्वारे बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन पुणे कार्यालयाच्या वायुवेग पथकाने कारवाई केली आहे. यासंबंधी एका प्रकरणात न्यायालयाने संबंधित वाहन मालकास १६ हजार रुपये तसेच खासगी वाहनाचा व्यावसायीक वापर करण्यास प्रवृत्त करणाऱ्या कंपनीस ८ हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे.

            अॅप आधारित सेवा पुरविणाऱ्या कंपनीद्वारे ग्राहकांना खासगी चारचाकी वाहने भाड्याने देण्याची सेवा देण्यात येत होती. याबाबत जागरुक नागरिकांनी व टॅक्सी सेवा देणाऱ्या इतर व्यावसायकांनी माहिती दिली. सदर सेवा परिवहनेतर (खासगी) संवर्गात नोंदणीकृत असलेली वाहने व्यावसायीक कारणासाठी वापरण्याची मोटार वाहन कायद्यान्वये परवानगी नाही. संबंधित सेवा बेकायदेशीर असल्याने हे   अॅप बंद करण्यासाठी पोलीस सायबर सेलला कळविण्यात आले आहे.  २७ मार्च रोजी अशा प्रकारची सेवा कंपनी देत असल्याने हे खासगी वाहन वायुवेग पथकाने पुणे कार्यालयात अटकावून ठेवले आहे.

            मोटार वाहन न्यायालय पुणे येथे आज ७ एप्रिल रोजी  न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. संबंधित वाहन मालकास १६ हजार तसेच खासगी वाहनाचा व्यावसायीक वापर करण्यास प्रवृत्त करणाऱ्या कंपनीस ८ हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात आला. वाहन वापर परवाना नसताना करण्यात येत असल्याने वाहनाची नोंदणी मोटार वाहन कायदा नियमाप्रमाणे ९० दिवस निलंबित करण्यात आली आहे.

            प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकांमार्फत अशा वाहनांवर यापुढेही कारवाई सुरु राहणार असून नागरिकांना अशा विना परवाना अँपबेसड  सेवा देणाऱ्या कंपन्यांची सेवा प्रवास वापरु नयेतसेच वैयक्तीक वापरासाठी नोंदविलेले वाहन (खासगी) भाड्याने बेकायदेशिर सेवा देण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येऊ नये असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

संजय ससाणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages