केसरी कार्डधारका सोबत नगरसेविका सीमा पाटील यांचा मोहोळ तहसीलवर धडक मोर्चा

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- दहा ते पंधरा वर्षापासून मोहोळ शहरामधील नागरिकांना केसरी कार्डवर प्राधान्य कुटुंब यादीत नसल्याने धान्य मिळत नाही व त्यामुळे नागरिकांची उपासमार होत असल्याने गेल्या वर्षी कोरोनाच्या लॉक डाऊन मध्ये सामान्य नागरिकांचा जगण्या-मरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांचे अन्न-धान्य वाचून उपासमार झाली यानंतर मी लोकप्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा ना श्री छगन भुजबळ साहेब यांना तसेच मोहोळ तहसीलदार यांना यासंदर्भात दिनांक 7 /4 /20 रोजी निवेदन दिले होते यावर आजतागायत कोणताच निर्णय झाला नाही म्हणून आज तहसीलदार मोहोळ व पुरवठा अधिकारी मोहोळ यांना सदर बाब लक्षात आणून देऊन मागील संदर्भानुसार शहरांमध्ये आम्ही शिवसेनेच्यावतीने चार दिवस यासंदर्भात शिबिर घेण्यात आले होते या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला यानुसार मोहोळ शहरात 20 11 च्या लोकसंख्येनुसार शहरी भागासाठी ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार शहरातील काही लाभार्थी अंतोदय व प्राधान्य कुटुंब योजनेत येत आहेत सध्या मोहोळ शहरामध्ये अंतोदय (A.A.Y.) व अन्नसुरक्षा (R.H.H.) या कार्डधारकांना धान्य वितरीत होत आहे परंतु प्राधान्य कुटुंब यादीत नसलेल्या मोहोळ शहरातील केशरी शिधापत्रिका कुटुंब धारक असलेल्या नागरिकांना सध्याच्या काळात रेशनवर धान्य मिळत नाही यामुळे या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे तरी प्राधान्य कुटुंब यादीत नसलेल्या नागरिकांसाठी आम्ही घेतलेल्या शिबिरांमध्ये 560 कुटुंब प्रमुखांनी आपले अर्ज आमच्याकडे सादर केले, 560 कुटुंबाची अंदाजे लाभार्थी लोकसंख्या 3300 असून सदर केसरी शिधापत्रिका कुटुंब धारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे व विशेष इष्टांक व धान्य वाढवून शासनामार्फत त्वरित प्रत्येक केसरी कार्डधारकांना कायमस्वरूपी धान्य देण्यात यावे अन्यथा लाभार्थ्यास सह लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाच्या मागणी साठी 590 लाभार्थ्यास सह मोहोळ तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी यावर तहसीलदार मोहोळ व पुरवठा अधिकारी मोहोळ यांनी पुढील कार्यवाही तात्काळ करू असे सांगितले. मा. नगरसेविका सीमाताई पाटील, उप जिल्हा प्रमुख दादासाहेब पवार शिवसेना शहर संघटक रणजीत गायकवाड सामाजिक कार्यकर्ते शिवरत्न गायकवाड, मुख्याध्यापक विष्णू मस्के, युवा सेना तालुका प्रमुख राजरत्न गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विजय दादा गायकवाड, किसन केवळे, संतोष माळी, हैदर इनामदार, सोमा पोळ, योगेश लेंगरे, गणेश पासले,अभिषेक घुले, सुरज गायकवाड, अलीम बागवान निशांत माळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते* या निवेदनाच्या प्रती अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. श्री छगन भुजबळसो, सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी, तालुका पुरवठा अधिकारी ,यांना देण्यात आले आहेत
0 Comments