माढ्यातील माढेश्वरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या शहाजी मोहनराव साठे तर उपाध्यक्षपदी समिर सापटणेकर

माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील माढेश्वरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी लोकमंगल नागरी पतसंस्थेचे संचालक तथा माढा नगरपंचायतीचे नगरसेवक शहाजी मोहनराव साठे यांची तर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक समिर सापटणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ९ मार्च २०२२ रोजी संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत ११ सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती.बुधवार ६ एप्रिल रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणुक निवडणुक निर्णय अधिकारी ए.एस.कोळी यांच्या उपस्थितीत पार पडली.अध्यक्षपदासाठी शहाजी साठे व उपाध्यक्षपदासाठी समिर सापटणेकर यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित झाली.शहाजी साठे हे १९९९ पासून सोसायटीचे अध्यक्षपद भुषवित असून बॅंक स्तरावर सोसायटीची शंभर टक्के तर सभासद स्तरावर ६५.२० टक्के वसुली आहे. सोसायटीची एकुण सभासद संख्या २५२ इतकी असून सन २०२० - २१ या आर्थिक वर्षाचा नफा १ लाख ५२ हजार ३५० रूपये आहे.आगामी कार्यकाळातही आपण गरजू शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे नूतन अध्यक्ष शहाजी साठे यांनी सांगितले.यावेळी संस्थेचे सचिव चंद्रकांत जाडकर,बाळासाहेब गोडगे,हर्षवर्धन साठे आदी उपस्थित होते.नुतन अध्यक्ष-उपाध्यक्षाचा सत्कार करण्यात आला.
नुतन सोसायटीचे सदस्य खालीलप्रमाणे-
शरद शंकर ताकमोगे,धनाजी धोंडोजी पवार,दिलिप प्रल्हाद चव्हाण,धोंडीबा सुर्यकांत साठे,संजय वासुदेव पिलिवकर,सुभाष यशवंत खरात,हनुमंत संभाजी माने,तारामती हनुमंत परबत,योजना प्रमोद साठे.
0 Comments