Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात दहा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

 जिल्ह्यात दहा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महामानवास होणार अभिवादन;

 समता कार्यक्रमाचे उदघाटन

 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सर्वांना समान न्यायसमता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात आजपासून (दि.6) सलग दहा दिवस विविध कार्यक्रमांचे नियोजन केल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी दिली.

            यावेळी सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून समता कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी आढेजिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील यांच्यासह विविध समाजकार्य महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

             अनुसूचित जातीवंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सामान्य जनतेला व्हावीत्याचे उद्देश साध्य व्हावेतयासाठी जिल्ह्यात 6 एप्रिल ते 16 एप्रिल यादरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या वतीने "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" राबविण्यात येणार आहेअसल्याचे आढे यांनी सांगितले.

 

असा असेल सामाजिक समता कार्यक्रम...

 

गुरूवार दि.7 एप्रिल 2022 रोजी महाविद्यालयआश्रमशाळाशासकीय वसतिगृहनिवासी शाळा येथे डॉबाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिकसामाजिकआर्थिक व राजकीय विचार यावर वत्कृत्व स्पर्धानिबंध स्पर्धालघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन श्री. आढे यांनी केले आहे. शुक्रवार दि.8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्वाधारशिष्यवृत्तीयोजनांची माहिती आणि लघुनाटिका भारती विद्यापीठसमाजकार्य महाविद्यालयसोलापूर येथे तर तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीही हे कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सामाजिक न्याय भवन आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रक्तदान शिबीर तर 11 वाजता ज्येष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व मेळावा भारती विद्यापीठाचेसमाजकार्य महाविद्यालय येथे होणार आहे. रविवारी 10 एप्रिलला सकाळी 8 वाजता पार्क चौक तर 9 वाजता सात रस्ता येथे पथनाट्य आणि लघुनाट्य सादर होणार आहे.

 सोमवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महात्मा फुले जयंती साजरी करणे आणि यशवंतराव चव्हाणसभागृहजिल्हा परिषद सोलापूर येथे कृषी अधिकारी कल्याण श्रावस्ती यांचे महात्मा फुले सामाजिक कार्यावर व्याख्यानमंगळवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता सामाजिक न्याय भवन येथे मार्जिन मनी योजनेबाबत कार्यशाळा13 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता सर्व महाविद्यालयात संविधान जनजागृती कार्यक्रम14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी पार्क चौकातील डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे डॉबाबासाहेब आंबेडकर यांचे शेती/शेतकऱ्यांविषयी विचारांवर प्रागौतम कांबळे यांचे व्याख्यान. याशिवाय दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेबाबत मेळावा होणार आहे.

            शुक्रवारी 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक न्याय भवन येथे डॉबाबासाहेबांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल प्राडॉज्योतिवाघमारे, डॉजयश्री मेहता व डॉनिशा वाघमारे यांचे व्याख्यान व तृतीयपंथी व्यक्ती जनजागृती कार्यशाळा होणार आहे. शनिवारी 16 एप्रिल रोजी समता कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. यादिवशी अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीमध्ये स्वच्छता व लाभार्थी मनोगत होणार आहेअशी माहिती  आढे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments