Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डूवाडीत वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.!

 कुर्डूवाडीत वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.!


कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- वंचित बहुजन आघाडी चे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बार्शी नाका कुर्डुवाडी येथे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.कुर्डूवाडी  शहराध्यक्ष प्रदीप सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची मजबूत बांधणी पूर्ण शहरात करण्यात येत आहे.यावेळी महासचिव विशाल नवगिरे,ज्येष्ठ उपाध्यक्ष एम.बी.कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष सुदेश बडेकर,जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान हांडे,मोतीलाल शर्मा,तालुकाध्यक्ष समर्थ आखाडे,उपाध्यक्ष दयानंद जानराव उपस्थित होते.नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्याकरिता मध्यवर्ती ठिकाण म्हणून या संपर्क कार्यालयाचे उपयोग होणार असून पक्षाचे सदस्य नोंदणी पदाधिकारी नियुक्ती लवकरच या माध्यमातून केली जाणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले.या प्रसंगी उपाध्यक्ष अशपाक तवकल कृष्णा हजारे धनंजय कोटकर सागर पवार महासचिव गणेश शिंदे,जीशान मुलाणी,बाळासाहेब लांडगे,संजय साळुंखे,केतन आठवले,दत्ता भोसले,आकाश ओहोळ,मोहन कामशेट्टी,गणेश वाघमारे,सागर तरंगे,अमन कांबळे,ओमकार पवार,विशाल माने,दत्ता चव्हाण,बिरू देवकते,अझर शेख,अविनाश खंडागळे,अनुज गोरे,शुभम अस्वरे,साजिद शेख,चेतन केकडे, सागर केकडे,इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती नोंदविला.

Reactions

Post a Comment

0 Comments